चालू घडामोडी 10 जानेवारी 2020

लेखक मनोज दास ह्यांना ‘मिस्टिक कलिंगा लिटररी अवार्ड’ मिळाला

  • ओडिशा सरकारच्या वतीने मनोज दास ह्यांना ‘मिस्टिक कलिंगा लिटररी अवार्ड’ (भारतीय व वैश्विक भाषा) हा पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले आहे. मनोज दास ओडिया आणि इंग्रजी भाषेत लिखाण करतात.
  • 8 फेब्रुवारी 2020 रोजी भुवनेश्वर या शहरात ‘मिस्टिक कलिंग फेस्टिव्हल’ या महोत्सवाच्या पुरस्कार वितरण सोहळ्यात हा पुरस्कार प्रदान करण्यात आला.
  • पुरस्कार स्वरूपात 1 लक्ष रुपये रोख रक्कम, शाल व प्रमाणपत्र देण्यात आले.
  • ‘मिस्टिक कलिंग फेस्टिव्हल’ हा ओडिशा सरकारच्या वतीने आयोजित केला जाणारा वार्षिक साहित्य व सांस्कृतिक महोत्सव आहे.
  • हा कार्यक्रम 8 व 9 फेब्रुवारी 2020 रोजी आयोजित करण्यात आला होता. कार्यक्रमादरम्यान कविता वाचन, चर्चा, व्याख्यान, संगीत मैफिली आणि नृत्य यांचे सादरीकरण करण्यात आले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *